शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यास प्राधान्य- एकनाथ शिंदे

kolhapur-abnnitv
कोल्हापूर : सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सेवा रुग्णालय हे खाजगी रुग्णालयापेक्षाही अतिशय चांगली व दर्जेदार सेवा देणारे रुग्णालय असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नवीन बांधण्यात आलेल्या सेवा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त अभियान संचालक (NUHM) डॉ. सतीश पवार, उपसंचालक (आरोग्य) डॉ. पी.पी. धारुरकर हे उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, परमेश्वरानंतरचे स्थान हे डॉक्टरांचे असते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना चांगली सेवा दिली पाहिजे. सरकार सर्वसामान्य माणसाला आरोग्याची सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न आहेत. आरोग्य विभाग दुर्गम भागात अतिशय चांगल्या सेवा देत असून आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न आहे. सेवा रुग्णालय 50 बेडचे असून हे रुग्णालय खाजगी रुग्णालयापेक्षाही चांगले सेवा देणारे आहे. सेवा रुग्णालयाची इमारत ही अतिशय सुंदर व देखणी असून येथील स्वच्छता पाहून रुग्णांचा आजार निम्मा बरा होत असेल, अशा शब्दात सेवा रुग्णालयाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.